तब्बल 16 तास चालला जेजुरीचा "मर्दानी दसरा"
जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने "मर्दानी दसऱ्याचे" आयोजन करण्यात येते. तब्बल १६ तासापेक्षाही जास्त काळ हा सगळा सोहळा चालू होता. खंडा तलवारीचे मर्दानी खेळ झाल्यावर या सोहळ्याचा समारोप झाला. शेकडो वर्षापासून इथे चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क व्हायेला लागतात. मल्हारी मार्तंड ! जय मल्हार ! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उस्तव मूर्तींना आणून त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा पार पडला. त्या नंतर हा पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगतात ते म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा, १२ वर्षपासून ते ६० वर्षापर्यंत भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल ४२ किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दाताने उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते. ४२ किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.