माहिती अधिकारात झाले उघड 
 मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणी वाढल्या

मुंबई ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्तरातून गोळा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री निधीतील आठ लाख रुपये बँकॉकमधील नृत्यस्पर्धेत सहभागी झालेल्या शासकीय कलाकारांना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत अनिल कार्यकर्ते यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. 

बँकॉक-थायलंड येथे  २६ ते ३० डिसेंबर २०१५ या कालावधीत नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागासाठी खास बाब म्हणून ८ लाखांची आर्थिक मदत करण्याची विनंती सचिवालय जिमखाना यांनी केली होती. त्यावर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालय/निधी कक्षास आदेश जारी केले. ११ सप्टेंबर २०१५  रोजी ८ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून सचिवालय जिमखाना, मुंबई यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
 
समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करण्यात येतो. मुख्यमंत्री स्वतः  या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा गैरवापर करणे चुकीचा आहे, असा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नियमबाहय निधी देणे नैतिकतेला धरुन नसल्याचे सांगत  दिलेला ८ लाख रुपयांचा सांगत परत घ्या असे मागणीही गलगली यांनी केली आहे.
 
Top