जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जुन्नर तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस चे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी
बाजार समिती निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी केलेले रघुनाथ लेंडे, धोंडीभाऊ
पिंगट,भाऊ देवाडे आणि शिरिष बो-हाडे यांची पक्षाने हकालपट्टी केलेली नाही
असे आज जाहीर केले.
परंतु बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करत आहे. असे जाहीर केले होते मग कामठे यांनी जाहीर केलेली भूमिका केवळ दिखावू पणा होता का? आणि जुन्नर मध्ये जर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते बंडखोरांना संरक्षण देत असतील आणि पक्ष पण बंडखोराबरोबर उभा राहत असेल तर येणा-या Z.P आणि पंचायत समिती निवडणुकीत तिकीट नाकारणारे बंडाचा झेंडा हातात घेऊ शकतात .आणि ते वरिष्ठ नेत्यांच्या आशिर्वादाने त्यामुळे जिल्हाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर जुन्नर राष्ट्रवादी कडे लक्ष दिले नाही तर विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असे राष्ट्रवादीचे कार्येकर्ते खाजगीत बोलत आहेत.
कारण अंतर्गत बंडखोरीचा फटका मागील निवडणुकीत तालुका अध्यक्षांना बसला आहे ते यातून कसा मार्ग काढतात तो येणारा काळच ठरवेल . ( प्रतिनिधी - तुषार येवले )