सरकार विरोधात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

बारामती ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालीये , आणी याच निमित्ताने राष्ट्रवादीकडून विविध जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात आंदोलन केल  जाणार आहे , राज्यामध्ये वाढती महागाई, शेती पाण्याचे चुकीचे धोरण, जीवानावश्यक वस्तुचे वाढलेले भाव, साठेबाज व्यापाराचे हित, ऊस उत्पादकाला मदत नाकारणे, दुष्काळी मदत न करणे, सहकार मोडीत काढणे, दुधउत्पादकच्या दुधाचा भाव, जानाई- शिरसाई व पुरंदर उपसा सिचंन योजना आवर्तन न सोडणे,  शेतमजुर व शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महीला, दुजाभाव करणे, इत्यादी घटकाला मदत न करने अशा विविध कारणांसाठी   केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी आणि  निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या  मंगळवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालय ते प्रांत कार्यालय बारामती येथे खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली  " हल्लाबोल थाळीनाद" आंदोलन करणार असल्याची माहिती संभाजी होळकर , तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस  यांनी दिली .
 
Top