आशियातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूसाठी जैविक लस तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. ही लस बाजारात आणण्यासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात असून त्यानंतर ही लस बाजारात आणली जाईल. सध्या या लसीचा एक डोस घेण्यासाठी ५ ते १० हजार रूपये खर्च करावे लागतील असेही सांगितले जात आहे. एक वर्षनंतर ही लस बाजारात दाखल होईल.
प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला अध्यक्ष असलेल्या सिरम संस्थेने ही लस अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनी व्हिस्तेरा यांच्या सहकार्याने तयार केली आहे. संस्थेचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले, ही लस डेंग्यूच्या चार प्रकारांवर परिणामकारक आहे. सुरवातीला लसीची किंमत अधिक असली तरी उत्पादनात वाढ होईल तशी तिची किंमत कमी होत जाईल. इंजेक्शनद्वारे ही लस रूग्णांना देता येणार आहे. सरकारची या लसीसाठी मंजुरी आली तर डेंग्यू उपचारासाठी लस तयार करणारी सिरम ही पहिली संस्था असेल.
जगात दरवर्षी ४० कोटी नागरिकांना डेंग्यूची लागण होते. १०० देशात २५० कोटी नागरिकांना डेंग्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही डासांमुळे हो