radhakrishna
पुणे : सनातनपर्यंत कर्नाटकमधील प्रख्यात लेखक एम. एम. कलबुर्गी हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचल्यामुळे कर्नाटक पोलिस कारवाई करणार, तोच महाराष्ट्र पोलिसांनी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक केली. महाराष्ट्रापूर्वी कर्नाटक पोलिसांनी कारवाई केली, तर राज्य सरकारची नाचक्की होईल, या भीतीपोटी ही कारवाई करण्यात आल्याचा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्याकांडात सनातनचा सहभाग दिसून येतो आहे. वैचारिक विरोधकांची हत्या करण्याचे त्यांचे कारस्थान उघड झाले आहे. सनातनविरोधी विचारवंत आणि पत्रकारांनाही जाहीरपणे धमकावले जात आहे. तरीही सनातन विरोधात राज्य सरकार ब्र देखील काढायला तयार नाही. सनातनसारख्या दहशतवादी संघटनेला आता राजाश्रय लाभल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
 
Top