ds-kulkarni
‘अर्थव्यवस्थेत उद्योगांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान
पुणे – ‘‘वैश्‍विक स्थरावर व्यवसाय करताना भाषा कधीच अडसर ठरत नाही. प्रामाणिकपणा, सचोटी आणि आपल्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवल्यास यश हमखास मिळते. किंबहुना हीच यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी केले.
माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या आर्टर्स, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातील (एमएसीएस) मॅक्सकॉम आणि मॅक्सानॉमीक्स या असोशिएशनतर्फे ‘अर्थव्यवस्थेत उद्योजकांचे योगदान’ या विषयावर डी. एस. कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजीराव मोरे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शुंभागी गायकवाड, कला विभागप्रमुख प्रा. रजनी मोती आणि संगणक विभागप्रमुख डॉ. शंकर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
डीएसके म्हणाले, ‘‘सकारात्मक विचार व सतत नवनिर्मीतीचा ध्यास याला उद्योगांत खूप महत्त्व आहे. आलेल्या संकटांना व कष्टांना सतत सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. आत्मविश्‍वासाच्या जोरावर कोणत्याही उद्योगांत यशस्वी होता येते.’’
प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, प्रा. डॉ. तानाजीराव मोरे यांनीनी आपली मनोगते व्यक्त केली. तन्वी शुक्लआणि सुरज अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.शुंभागी गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनात सर्व विभागप्रमुखांसह कलाव वाणिज्य विभागातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
Top