attack
मुंबई – मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेल आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सोमवारी रात्री एका अज्ञाताचा आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन विमानतळाच्या व्यवस्थापकाला आला. कारमध्ये स्फोटके ठेवून मुंबई विमानतळासह ताज हॉटेलवरही हल्ला करण्याचीही धमकी देण्यात आली आहे. व्यवस्थापकाने त्वरित ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून पोलिसांनीही या धमकीची दखल घेत विमानतळावरील सुरक्षेत वाढ केली आहे. तर, फोन क्रमांकावरून धमकीचा फोन करणा-याचा ठावठिकाणा आणि नेमका फोन कुठून आला, याचा तापस देखील सुरू करण्यात आला आहे.
 
Top