bharat-jadhav
लवकरच छोटय़ा पडद्यावर मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता भरत जाधव पुनरागमन करणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘आली लहर केला कहर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भरत जाधव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा मोठय़ा पडदा गाजविलेले अभिनेते किंवा अभिनेत्री यांना दूरचित्रवाहिनीच्या छोटय़ा पडद्यानेही भुरळ घातली आहे. ‘सहय़ाद्री’ वाहिनीवर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले एका कार्यक्रमात निवेदक/सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सचिन खेडेकर, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, वैभव मांगले, प्रशांत दामले आदी कलाकार मंडळी वेगवेगळ्या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकाबाहय़ कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाली आहेत. यात आता भरत जाधवची भर पडली आहे. ‘आली लहर केला कहर’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केदार शिंदे याचे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा विनोद प्रेक्षकांसमोर येणार असून भरत जाधवही वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.
 
Top