somnath
नवी दिल्ली – आपचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असून भारती यांनी सोमवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नाटकीय पद्धतीने स्व:ताला पोलिसांच्या स्वाधीन केली. भारतीय राज्यघटनेची प्रत हातात घेऊन सव्वा दहाच्या सुमारास भारती हे द्वारका पोलीस ठाण्यात पोहचले.
पोलिसांनी भारती यांना द्वारका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी हलवले आहे. सोमवारी रात्रभर त्यांना पोलीस ठाण्यात राहवे लागणार असून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. भारती यांनी राज्यघटनेची प्रत दाखवत मी पळून जात नाही, तर कायद्याचा आधार घेऊन बचाव करत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, सोमनाथ यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने कौटुंबीक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. तर सत्र व उच्च न्यायालयाने सोमनाथ यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भारती यांना पोलिसात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
 
Top