phil
ब्रिजटाऊन – फिल सिमन्स यांना वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावरून हटविण्यात आले आहे. सिमन्स यांना निवड समितीवर केलेल्या टीकेच्या दुसऱ्या दिवशी निलंबित करण्यात आले आहे.
सिमन्स यांनी निवड समितीवर श्रीलंका दौऱ्यासाठी ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलर्ड यांना एकदिवसीय संघात सामील न केल्याने कडाडून टीका केली होती. तसेच निवड समितीच्या निर्णयावर बाहेरून हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. मात्र विंडीजच्या एकदिवसीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर सिमन्स यांनी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते.
 
Top