गोंझाऊ : गोंझाऊ खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीने पटकावले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सानिया-मार्टिना जोडीने प्रतिस्पर्धी चीनच्या शिलिंग शू आणि आमि शिओदी यू जोडीचा ६-३, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे सानिया-मार्टिना जोडीला अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. याआधी उपांत्यफेरीत सानिया-मार्टिना जोडीने इस्त्रायलच्या ज्युलिया ग्लुश्को आणि स्विडनच्या रेबेका पीटरसन जोडील पराभवाची धूळ चारून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याआधी, सानिया आणि हिंगीसने शुक्रवारी ग्वांगझु ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत इस्रायलची ज्युलिया ग्लुस्को आणि स्वीडनच्या रोबेस्का पीटरसनचा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने लढतीत ६-३, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची