माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथे स्व. तानाजी (आप्पा)यादव यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त श्री नरेंद्र यादव पोलीस पाटील मिञ मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय समुह न्यृत्य स्पर्धेत गु-होळी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवुन भुलेश्वर चषकाचे मानकरी ठरले.
माळशिरस येथील सुर्या लाँन्स येथे पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या समुह न्यृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.यात गु-होळी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवुन रोख रक्कम...व भुलेश्वर चषकाचे मानकरी ठरले.तर द्वितीय क्रमांक जिजामाता विद्यालय जेजुरी. तृतीय क्रमांक राजे शिवराय विद्यालय घेरा पानवडी,चतुर्थ क्रमांक डाँ पतंगराव कदम विद्यालय दौडज, पाचवा क्रमांक। विद्यालय। उत्तेजनार्थ प्रथम शारदा इंग्लिश मेडिअम स्कुल वाघापुर उत्तेजनार्थ द्वितीय श्री भुलेश्वर विद्यालय माळशिरस विजेते ठरले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ तांबे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाले बद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, कृषि शिक्षण व संशोधन परीषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते,निरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप,पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर, उपसभापती ईश्वर बागमार, काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश मेमाणे, महिंन्द्रा अँन्ड महिंन्द्रा कंपनीचे भानुदास माने, दत्ताञय यादव,श्री भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, महादेव चौधरी ,दिलीप वाल्हेकर,जेजुरी पोलीस स्टेशनचे रामदास वाकोडे,लोणंद पोलीस स्टेशनचे संदीप भोसले .सासवड पोलीस स्टेशनचे गौड,यवत पोलीस स्टेशनचे शशिकांत चव्हाण, नामदेव ताकवले,श्री नरेंद्र यादव मिञ मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ तांबे,खजिनदार दिलीप गायकवाड, सचिव गणेश यादव,गु-होळीचे सरपंच रामचंद्र खेडेकर,माऊली यादव,सुनिल यादव,हिरालाल यादव,चेअरमन रामदास गायकवाड,व भुलेश्वर शुगर्सचे संचालक गणेश ढोले व परीसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुञसंचालन रामदास शिंदे व सुनिल जाधव.स्वागत पोलीस पाटील नरेंद्र यादव तर आभार रमेश गायकवाड यांनी मानले.(प्रतिनिधी - विनय गुरव)

