राजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज) -
                     बेल्हा परिसरातील बेल्हा-आळकुटी रस्त्याजवळ इदगाह मैदानच्या शेजारी असलेल्या झाडीमध्ये लहानमोठी अशी एकूण ३९ जनावरे बांधलेल्या अवस्थेत आढळली
          अधिक माहिती देताना उपनिरीक्षक म्हस्के यांनी सांगितले कि दि-१५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पो.नि. क्रांतीकुमार पाटील यांनी फोन करून कळवले कि  बेल्हा परिसरातील इदगाह  मैदान या परिसरातील झाडी जवळ एका अज्ञात इसमाने ३९ लहान मोठी जनावरे हि कत्तल करण्याच्या किंवा कत्तल खाण्याला विकण्याच्या उद्देशाने येथे बांधून ठेवली आहेत.
 त्यानुसार उपनिरीक्षक म्हस्के आणि पो.कॉ.लोंढे आणि पंच  हे खाजगी  वाहनाने तेथे पोहचले व  छापा टाकला असता हि सर्व जनावरे  एकाच रस्सीच्या आणि विना चार पाणी म्हणजेच कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेली आढळली आजूबाजूला चोकशी केली असता याबाबत कुठलीही माहिती मिळू शकली नाही विशेष म्हणजे हि सर्व  जनावरे हि १२४००० रु.एवढ्या किमतीची आहेत.
           त्यानंतर वरील सर्व घटनेचा उपनिरीक्षक म्हस्के यांनी व दोन पंचांबरोबर पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गौवंश हत्या,सुधारणा कायदा महाराष्ट्र प्राणी संरक्षण विधेयक १९९५ चे कलम ५(ब) ८(इ) सह.भारतीय कायदा १९६०चे कलम ११(१) नुसार अज्ञान व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाकःल झाला असून पुढील तपास पो.नि.क्रांतीकुमार पाटील आणि पो. उ. निकीषक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
    (प्रतिनिधी -केदारनाथ बारोळे)
 
 
 
Top