राजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
आळेफाटा परिसरातील संतवाडी येथिल वनविभागाच्या जंगलातील एका छोट्या बंधाऱ्यामध्येबिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मात्र या बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही .
आळेफाटा परिसरातील संतवाडी येथिल वनविभागाच्या जंगलातील एका छोट्या बंधाऱ्यामध्येबिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मात्र या बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या संतवाडी शिवारातील
मांजर मोख या डोंगरच्या पायथ्याशी असणार्या जंगलात बिबट्या मृत अवस्थेत
असल्याचे वनविभाग कार्यालय आळे यांना समजताच वनपाल कोकाटे,वनरक्षक कांचन
ढोमसे,मनीषा काळे,सोपान अनासुने वनमजूर सुरेश गायकर,बाबाजी खर्गे,यांनी
घटना स्थळी जाऊन पहिले असता तेथे मादी जातीचा अंदाजे २ वर्ष वयाचा बिबट्या
मृत अवस्थेत आढळला या घटनेचा वन विभागाने पंचनामा करून शव-विचेदानासाठी या
बिबट्याला आळे येथील वन विभाग कार्यालय येथे हलवण्यात आले आहे अशी
माहिती वनविभाग आळे यांनी दिली.(प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )