जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -   जुन्नर तालुक्यातील मंगरूळ शिवारातील आंबेविहीर येथे काल  सायंकाळी ५ च्या सुमारास शेतात काम करणाऱ्या कविता प्रदीप जाधव ( ३२ ) या महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने या  महिलेच्या मानेच्या  डाव्या बाजूवर हल्ला केल्याने बिबट्याचे दात खोलवर घुसल्याने  हि महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बेल्हे येथील रुग्नालायत उपचार सुरु आहे
    अधिक मिळाली माहिती अशी कि कविता प्रदीप जाधव हि महिला शेतामध्ये खुरपत असतना अचानक मागून आलेल्या बिबट्याने या महिलेवर हल्ला  केला तिच्या ओरडण्याने जवळच काही अंतरावर  असणारे तिचे पती प्रदीप विठ्ठल जाधव यांनी  आरडा ओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला.
      दुसरीकडे  त्याच शिवारातील काही अंतर्वर असणारे संदीप सहादू लामखेडे हे आपल्या उसाच्या शेतात जात असतना बिबट्याने त्यांच्या पाठीवर पंजाने वार  केला परंतु सुदिवाने त्यांनी तिथून पळ काढल्याने त्यांना पाठीत किरकोळ  जखम होऊन ते वाचले. 
         या बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले असून शेतकरी वर्गाला शेतीचे काम करने म्हणजे जिवावरची कसरत झाली असून त्यात प्राण धेखील जाण्याची शक्यता असतानं देखील वन विभाग किवा प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही . ( प्रतिनिधी -केदारनाथ बारोळे )
 
Top