पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पारगांव-सापापासुन माणसाचा आणि माणसापासुन सापाचा जीव वाचवणारया सर्पमित्राच्या जीवाच काय.असा प्रश्न उपस्थीत होतोय...
सर्वसाधारणपणे साप दिसला की सर्वांची तारंबळ होते.साप हा माणसाचा मित्र आहे असे आपण नेहमी बोलतो,परंतु अचानक साप पाहण्यात आल्यास मात्र आपण प्रचंड घाबरले जातो.सासवड शहरातील अमित श्रीरंग सांबरे यांची तुलना मात्र आपण भिणारयांमध्ये करूच शकत नाही. महावितरण च्या तात्पुरत्या सेवेत असणारे अमित यांनी आजपर्यंत पाचशे पेक्षा जास्त सांपाना पकडुन जिवदान दिले आहे,आणि अनेकांच्या घरामधील साप पकडुन त्यांचे प्राण हि वाचवले आहेत.
सासवड शहरांमध्ये असो किंवा आजुबाजुच्या गावांमध्ये कोठेही साप निघाला कि अमित यांचे पाचारण करावे लागते.आणि कसलाही साप असो ते अत्यंत शिताफीने काही मिनिटातच त्या सापाला पकडतात.तसे पाहता पुरंदर तालुक्यात शेती मोठ्याप्रमाणात आहे.त्यामुळे सांपाना राहण्यासाठी फिरण्याकरीता मोठा परिसर मिळत असल्याने वाड्यावस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साप अाढळतात,त्यात अनेक साप विषारी असतात मन्यार,फुरसे,घोणस,नाग या जाती विषारी असुन निम्म विषारी सांपामध्ये हरणटोळ,सापडा,मांजरया तर बिनविषारी सापात धामण,धुळनागीण,वाळा, डुरक्या,दिवड,तस्कर,कवड्या,गवत्
या,कुकरी,मांडुळ,तसेच
जुन्या दगडी बांधकाम असणारया मंदिरात चित्रक नाग आढळतात हे बिनविषारी
असतात यांचा समावेश आहे.गावाकडे साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न
होतो,परंतु माघिल काही वर्षांपासुन अमित हे सासवड आणि सासवडच्या
परिसरामंध्ये कुठेही साप निघाल्याचे समजले की त्या ठिकाणी जाऊन सापास जीवंत
पकडतात आणि वनखात्याच्या संरक्षित जंगल परिसरात सोडतात.
या गोष्टी करत असताना अमित यांच्याकडे साप पकडण्याठी लागणारे आणि साप चावल्यास त्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी अावश्यक साहित्य उपल्बध नाही.प्रशासनाने अशा काम करणारया सर्पमित्रांना साप पकडण्यासाठीची स्टिक आणि साप चावल्यावर त्यावर उपचार करण्यासाठीचे किट उपल्बध करुन द्यावे अशी मागणी त्यांच्या मित्रपरिवाराकडुन होत आहे.त्यांचे हे धाडस अांगावर काटा आणनारे ते सद्या संकेत गुरव आणि कुणाल सावळे यांना प्रशिक्षण देत आहेत.त्यामुळे इतरांचा जिव वाचवनारया सर्पमित्राचा जिव संरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने जरा इकडे लक्ष द्याव...
साप चावल्यावर सर्पमित्रांना सरकारी दवाखान्यात तात्काळ मोफत उपचार मिळावे कारण साप चावल्यावर उपचारासाठी होणारा खर्च हा खुप मोठा असतो आणि तो खर्च करण्याची परिस्थिती सर्पमित्रांची नाही..(प्रतिनिधी-स्वप्नील गायकवाड.पारगांव मेमाणे.)