जम्मू-काश्मीर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
            मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर नव्या सरकारच्या स्थापनेला विलंब होत असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली असल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिल्लीत सांगितले. राज्याचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्याची केलेली शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली.
पीडीपी विधिमंडळ पक्षाच्या २८ आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी मेहबूबा मुफ्ती यांची निवड केली असली, तरी वडिलांच्या मृत्यूचा शोककाल पूर्ण होईपर्यंत या पदाची शपथ घेण्यास त्या इच्छुक नसल्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करणे भाग पडले आहे.

 
Top