पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील गु-होळी विद्यालयाचे मुख्याद्यापक रामदास जगताप यांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धेत प्रथम क्रमांकाची हँट्रीक साधली आहे. विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी गु-होळी विद्यालयाचे मुख्याद्यापक रामदास जगताप हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन स्पर्धेची जोरदार तयारी करतात. लोकनेते शरद पवार यांच्या आमृत मोहोत्सवी वर्षा निमित्त शरद मल्हार प्रतिष्ठान पुणे,जिल्हा परीषद माध्यमीक विभाग आयोजितआंतर शालीय लोकनृत्य स्पर्धेत न्यु इंग्लिश स्कुल गु-होळी विद्यालयाने लहान गटात पुरंदर तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्यांनी मल्हारी मार्तड हे नृत्य अप्रतिमरित्या सादर केले.त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परीषदेच्या वतीने आयोजित पुरंदर तालुका आंतर शालीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्यांनी "ओझ" हे नाटक चांगल्या प्रकारे सागर केले. "ओझ" या नाटकातील संकेत यादव यास उत्कृष्ट अभिनय तर विद्यालयातील सहशिक्षक मनोहर आंबले यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारीतोषीक मिळाले आहे.सध्याच्या परीस्थीतीवर भाष्य करणारे व पालकांच्या मुलांकडुन असणा-या अवास्तव मागण्या व त्यावर होणारे दुष्परिणाम दाखवुन समस्त पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यात "ओझ" हे नाटक यशस्वी ठरले. त्याचप्रमाणे पुणे येथील किर्लोसकर फाऊंडेशनच्या "स्वच्छ सुंदर शाळा "स्पर्धेतही पुरंदर, भोर,बारामती,इंदापुर, या चार तालुक्यातुन ग्रामीण विभागाच्या शाळांमध्ये न्यु इंग्लिश स्कुल गु-होळी विद्यालयाने दुस-यांदाही प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयाने ग्रामस्वच्छता, वैयक्तीक सामाजिक आरोग्य, स्वच्छतेच्या सवयी,आरोग्य विषयक कार्यशाळा, वृक्षाबंधन सुविचाराची दहीहंडी, वृक्षारोपण,बीज विखुरणे, इत्यादी उपक्रम राबवुन विद्यालयाने चार तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे.दहा हजार रुपये बक्षिस देऊन गौरवण्यात आले.विद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमाने विद्यार्थांच्या अंगी नम्रता,सौजण्यशिलता श्रम प्रतिष्ठा इत्यादी गुणांमध्ये भर पडलेली आहे.त्याचप्रमाणे गुणवत्ता मध्येही विद्यालय अव्वल स्थानी आहे.
पुरंदर तालुक्यातील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान हिवरे आयोजित पुरंदर युथ फेष्टीवल तालुका स्तरीय लोकनृत्य स्पर्धेतही गु-होळी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आकरा हजार रुपये,सन्मानचिन्ह, व प्रशस्तीपञक देऊन त्यांना गौरवण्यात आले.विद्यार्थांना विद्यालयाचे मुख्याद्यापक रामदास जगताप,सचिन घोलप, अरुण यादव,सुभाष काळे, प्रदीप खेडेकर,वैशाली कुंजीर, शरद चौधरी, हरिश्चंद्र खेडेकर,प्रदीप काळे,सुनिल बधे,छगन खेडेकर,राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले तर या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, गु-होळीचे सरपंच रामचंद्र खेडेकर,जयसिंग भोसले,हिरामण खेडेकर,धर्माजी खेडेकर,उत्तम खेडेकर,संपत खेडेकर,गोरख खेडेकर,तानाजी खेडेकर,कैलास जाधव, मधुकर खेडेकर,यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे. ( प्रतिनिधी - विनय गुरव )
