माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
          संपुर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पकलेचा खजिना म्हणुन ओळख असणा-या  भुलेश्वर. मंदिरात आज पुणे येथील फिल्म अँन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणीक प्रकल्पा अंतर्गत चित्रीकरण केले. आणि ब-याच दिवसांनी सुमधुर वाद्यांच्या आवाजाने भुलेश्वर मंदिरातील वातावरण प्रसन्न झाले.
      विद्यार्थ्यांनी आज सकाळी ६ वाजता मंदिरातील शिवलिंगाचे पुजन व आरती केली त्यानंतर शिवलिंगासमोरिल ध्यान मंडपात डॉ. सुव्रतदेव वंद्योपाध्याय  यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने चित्रीकरणास सुरवात झाली.या गायनास वादक मदन काळे व निखील घोरपडकर यांनी  साथ दिली.
    मंदिर, मंदिरातील शिल्पसौंदर्य , प्रदक्षिना मार्ग , भव्य नंदी इत्यादी भागाचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण करताणा भाविकांना त्रास होऊ नये म्हणुन दर्शनरांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्या साठी सुरक्षा रक्षकाची नेमणुक करण्यात आली होती. मुख्य शिवलिंग आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते.
     यावेळी दिग्दर्शक अमेय गोरे म्हणाले कि, भारतीची जुनी संस्कृती आज फक्त मंदिरामध्येच जशीच्या तशी पहावयास मिळते. व ती संस्कृती खोल पर्यंत शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करित आहोत.ती आहे तशी रहावी तिचे जतन व्हावे हा आमचा मुळ उद्देश आहे.
या चित्रीकरणात चलतचित्रकार अर्चना घाग्रेकर, ध्वनी संकलन पीयुश शहा, निर्मिती सह्हायक जोसेफ यांची मोलाची मदत झाल्याचे अमेय गोरे यांनी सांगीतले. (प्रतिनिधी -विनय गुरव)


 
Top