माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील टेकवडी गावापासुन पिसर्वे गावाकडे जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक खड्डे पडले असुन वाहण चालकांना चांगलीच कसरत करावी लागते.
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात सासवड सुपा -रोड व सासवड- यवत रोड यांना जोडणारा एकमेव चांगला रस्ता आहे. माळशिरस गावापासुन पिसर्वे चार किलोमीटर वर आहे.माञ रस्त्यावरील खडी वर आली आहे.अनेक वाहणे निकामी होतात. गाड्यांचे टायर पंक्चर होतात. यामुळे या मार्गाने वाहणे जाणे टाळतात. यामुळे टेकवडी गावावरुन पिसर्वे गावाला जाण्यासाठी सर्वच याच मार्गाचा वापर करतात. पिसर्वे येथुन जेजुरीला जाता येते यामुळे माळशिरस,पोंढे,टेकवडी या गावांचा जास्त संपर्क येतो. या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.माञ त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते.यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी टेकवडीचे सरपंच यशवंत ठोंबरे उपसरपंच दत्ताञय झिंजुरके,टेकवडी तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष बाळकृष्ण झिंजुरके, राजेंद्र झिंजुरके यांनी केली आहे.
(प्रतिनिधी - विनय गुरव)
