नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
           चॅटिंगसाठी जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपकरीता आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात येणार आहे. व्हॉट्सऍप आता पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे. फेसबुक कंपनीच्या मालकीचे हे ऍप असून, कंपनीने या वर्षापासून वार्षिक शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपसाठी एक डॉलर (68 रुपये) वार्षिक शुल्क आकारण्यात येत होते. आगामी काही आठवड्यात व्हॉट्सअॅपचं वार्षिक शुल्क पूर्णपणे बंद केले जाईल. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाकडे डेबिट वा क्रेडिट कार्ड असेलच असे नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअॅपच्या सर्व व्हर्जनचं शुल्क हटविले जाईल. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता पूर्णपणे मोफत असेल,‘ असे कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे जाहीर केले आहे.


 
Top