वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्युज)-
भारतीय अंतराळ संशोधन
संस्थेच्या पीएसएलव्ही सी ३१ या ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १
इ हा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला आहे. आयआरएनएसएस प्रणालीत
सात उपग्रह सोडले जाणार असून त्यातील हा पाचवा उपग्रह आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश
केंद्राच्या अवकाशतळावरून हा उपग्रह
सोडण्यात आला. या वर्षांत आणखी दोन
उपग्रह सोडून आयआरएनएसएस प्रणाली पूर्ण
करण्यात येणार असून त्यामुळे आपल्याला
देशी जीपीएस सेवा उपलब्ध होणार आहे.
भारतीय दिशादर्शन उपग्रह प्रणालीचा एकूण
खर्च १४०० कोटी रुपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात
भारतीय अंतराळ संस्थेच्या
वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
पीएसएलव्ही सी ३१ या प्रक्षेपकाच्या
विस्तृत आवृत्तीचा वापर अकराव्यांदा
करण्यात आला. आयआरएनएसएस १ इ या
उपग्रहाचे उड्डाणावेळी एकूण वजन १४२५ किलो
होते. अवघ्या एकोणीस मिनिटात सकाळी ९.३१
वाजता हा उपग्रह नियोजित कक्षेत
सोडण्यात आला आहे. इस्रोचे अध्यक्ष
ए.एस.किरणकुमार यांनी सांगितले की,
पीएसएलव्ही ३१ या प्रक्षेपकाने
आयआरएनएसएस १ इ हा उपग्रह यशस्वीरीत्या
अवकाशात सोडला आहे. आकाश काहीसे ढगाळ
असल्याने लोकाना हे उड्डाण पाहण्याचा
आनंद घेता आला नाही. आयआरएनएसएस १
इ उपग्रहाची वैशिष्टय़े या मालिकेतील
पूर्वीच्याच उपग्रहांसारखी असून
आयआरएनएसएस १ ए, १ बी, १ डी हे उपग्रह
पीएसएलव्ही सी २२, सी २४, सी २६, सी २७ या
प्रक्षेपकाच्या मदतीने सोडले
गेले होते.स्थाननिश्चितीसाठी उपयोग
आयआरएनएसएस १ इ
या उपग्रहावर सी बँड ट्रान्सपाँडर असून त्यातील सुविधांच्या मदतीने
१५०० कि.मी परिसरातील वस्तूंचे स्थान अचूकपणे सांगता येणार आहे. या
उपग्रहावर कॉर्नर क्यूब रेट्रो रिफ्लेक्टर्सचा वापर लेसर रेंजिंगसाठी करण्यात
आला आहे. प्राथमिक क्षेत्रात २० मीटर भागातील वस्तूचे अगदी अचूक स्थान
त्यामुळे सांगता येईल.
