पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
          दिनांक 1/1/2011 रोजी केन्द्र सरकार व् राज्य सरकरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात  ई पंचायत प्रकल्प सुरु झाला महाराष्ट्रात महाऑनलाईन ह्या खाजगी कंपनी द्वारे ह्या प्रकल्पाचे काम पाहिले  जावु लागले.
या कंपनी मध्ये चलणाऱ्या निखळ भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रतील सर्व संगनक परिचालकांनी एकत्रित येऊन काही मागण्यांचा विधान भवनावर मोर्चा काढला 2 वेळा मुंबई 1 वेळा नागपुर .15 डिसेंबर 2015 नागपुर या ठिकाणी झालेल्या मोर्चा मध्ये पोलिसांनी अचानक केलेल्या लाठी हल्यात १ संगनक परिचालक मृत्यु मुखी पडला त्या नंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे लेखी आश्वासन देवुन मोर्चा मगे घेण्यास प्रवुत्त केले परंतु महाऑनलाईन कंपनी ने 30 /12/  2015रोजी  सर्व संगनक परिचलकना 31 /12/ 2015 पासून कंपनी बंद होत असून कंपनी व् तुमचा काहीही संबंध नाही असा संदेश पाठविल्यामुळे आता संगनक परिचालक ऑनलाईन का ऑफलाईन या गहन प्रश्नावर चर्चा व नागपुर येथील मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या संगनक परिचालकाच्या कुटुंबीयांसाठी आपत् निधी जमा करणे साठी पुणे जिल्हा संगनक परिचालक संघटनेची बैठक आज पुणे सारसबाग येथे झाली . यावेळी अध्यक्ष संतोष कुंडले म्हणाले की १५ डिसेंबर २०१५ रोजी नागपुर येथे झालेल्या मोर्चात ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवुन गेली ४ महिने पगार न मिळुन सुध्दा व ३१ डिसेंबर रोजी महाऑनलाईन कंपनीचा करार संपुन सुध्दा सर्व संगनक परिचालक अजुनही कामावर हजर आहेत.
    यावेळी संदिप तुपे, बालाजी बोडके, राम गोळे, राजु लोणकर, मुन्नीर शेख, वर्षा शिंदे, रोहित जगताप , सुशिला काळे व जिल्ह्यातील संगनक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.१५ डिसेंबर २०१५ रोजी नागपुर येथे झालेल्या मोर्चात ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवुन गेली ४ महिने पगार न मिळुन सुध्दा व ३१ डिसेंबर रोजी महाऑनलाईन कंपनीचा करार संपुन सुध्दा सर्व संगनक परिचालक अजुनही कामावर हजर आहेत.(प्रतिनिधी - विनय गुरव)
 
Top