शरदचंद्रजी पवार महाविद्यालय,जेजुरीच्या वतीने पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या आंतरमहाविद्यालायीन रायफल व पिस्तूल शूटिंग (मुले / मुली) स्पर्धा पुणे महानगर पालिकेच्या हडपसर,पुणे येथील रेंज वर संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.जयवंत देसाई यांचे हस्ते झाले.या प्रसंगी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान,पुरंदर चे विश्वस्त नितीन मेमाने,पुणे जिल्हा विभागाचे सहसचिव प्रा.मंगेश पालवे, संयोजक डॉ.शिवाजी भिंताडे उपस्थित होते.
या स्पर्धेचे संयोजक सचिव डॉ.शिवाजी भिंताडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर स्नेहा नालकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्पर्धेचा अंतिम निकाल:-
१० मी.एअर रायफल (मुले)
प्रथम:-इब्रहिम रज्जा खान (३८२) आयसीएम कॉलेज
द्वितीय:-आफताब अश्पाक शेख (३२३) क्राईस्ट कॉलेज,वडगाव शेरी
त्रितीय:-अक्षय गडगे (०७१) बी.जे.कॉलेज,आळे

१० मी.एअर रायफल (मुली)
प्रथम:-प्राची प्रमोद गडकरी(३९४) राजश्री शाहू कॉलेज
द्वितीय:-दिव्याराणी भास्कर अंडाप्पा (३८६) ढोले पाटील कॉलेज
त्रितीय:-आरती अशोक मिरकिले (३६७) इंजी कॉलेज,माळेगाव

१० मी.एअर पिस्तुल (मुले)
प्रथम:-आकाश कानिंचे (३६०) टी.सी.कॉलेज,बारामती
द्वितीय:-सौरभ सालवने (३३५) इंदिरा इंजी.कॉलेज,ताथवडे
त्रितीय:-तुषार कृष्णमनी (२४२) डी.वाय.पाटील लॉ. कॉलेज,पिंपरी
 
Top