नागपूर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
           हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये असलेल्या भाजपच्या आमदारांचे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी  मार्गदर्शन केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री आणि विधानसभा व विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते. रेशिमाबागेतील स्मृतीभवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे ११० आमदार उपस्थित होते. डॉ. केशव हेडगेवार यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
           यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटे भैय्याजी जोशी यांनी उपस्थित आमदारांचे  मार्गदर्शन केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये त्यांनी सामाजिक भान ठेवून आमदारांनी काम कसे केले पाहिजे, याबद्दल हे मार्गदर्शन केले होते.


 
Top