माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
    संग्राम प्रकल्पात गेली 5 वर्ष काम करत असलेले पुरंदर तालुक्यातील सर्व संगणक परिचालक आपल्या मागण्या व् त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागपुर या ठिकाणी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धड़क मारणार आहे.हिवाळी अधिवेशनावर धड़क मारन्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व  संगणक परिचालक हे महाराष्ट् राज्य संगणक परिचालक संघटना ह्यांच्या समवेत राहनार आहेत.
     गेली 5 वर्ष हे सर्व संगणक परिचालक अगदी नगण्य मानधनावर ग्रामपंचायत या ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन होऊंन आता सर्व दाखले कमी वेळात ऑनलाइन स्वरुपात मिळत आहेत.  शासनाच्या नियमाने सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या कारभारात सुसूत्रता ही आली  परंतु ह्या सर्वामध्ये मात्र परिचलकांचे हाल झाले हे मात्र नक्की.
ह्या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी पुरंदर तालुका  संगणक परिचालक संगटना यांची 10 तारखेला सासवड ह्या ठिकाणी मीटिंग पार पडली व् सर्वानुमते 3 वाजता पुरंदर गटविकास अधिकारी यांना दिनांक 14 डिसेंबर 2015 पासून काम बंदचे निवेधन देण्यात आले यावेळी तालुका  अध्यक्ष श्री प्रशांत काळभोर, सचिव श्री मुनीर शेख सर्व कार्यकरणी व् सर्व संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी - विनय गुरव)
 
Top