पुणे सुपरफास्ट न्यूज -
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सोमवारी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात ७७ साक्षीदारांचे जबाब, समीरच्या दोन मैत्रिणी, एक मित्र, त्याने मोबाइलवरून इतरांना केलेल्या कॉलच्या संभाषणाचा प्रयोगशाळेने दिलेला अहवाल, तसेच त्याने ‘क्षात्रधर्म साधना’ हे पुस्तक वाचून त्यातील संदर्भाद्वारे पानसरे यांच्या हत्येचा कट रचला आदी बाबींचा समावेश आहे.
समीरवर खून, खुनाचा प्रयत्न, हत्येचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समीरला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पानसरे हत्या प्रकरणातील कागदपत्रे, अन्य पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाने परवानगी दिली. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सागरमाळ येथे १६ फेबु्रवारी २०१५ ला गोळीबार झाला होता. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी सांगलीतील समीर गायकवाड (२९) यास विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) अटक केली. एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी समीरचे दोषारोपपत्र तयार केले.