नागपूर (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघासाठी १० वर्ग किलोमीटरचे वन क्षेत्राची गरज असते. त्यामुळे वन क्षेत्र वाढविण्याचा विचार होत आहे. केंद्राने व्याघ्र प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मेळघाट, पेंच आणि ताडोबाला केंद्राने अतिउत्तम असे म्हटले आहे.
मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, एका वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला. राज्यात शिकारींच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाघांची संख्या वाढून १९० झाली आहे. सन २०१३ मध्ये ७ वाघांची शिकार झाली. २०१४ मध्ये केवळ एकाच वाघाची शिकार झाली.२०१३ मध्ये ५, २०१४-४, आणि २०१५ मध्ये ६ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या टायगर फोर्समुळे शिकारीवर नियंत्रण ठेवता आले आहे.