मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
शरद पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवर व पवारप्रेमींनी मोठी गर्दी केली. व्यासपीठावर पवारांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करीत आठवणी जागविणारे नेते आणि मान्यवर. तर, प्रेक्षागृहात पहिल्या रांगेत बसून सपत्नीक हा सोहळा अनुभवणारे पवार, असा अनोखा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये पाहायला मिळाला.
माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या व्यक्तिपर्यंत लोकशाहीची बांधिलकी पोहचविण्याचे काम यापुढील आयुष्यात करणार असल्याची कृतज्ञ ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नेहरु सेंटर येथील नागरी सत्काराला उत्तर देताना दिली.
या कृतज्ञता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना रिलायन्सचे मुकेश अंबानी म्हणाले की, ‘फक्त आणि फक्त उद्योग-व्यवसाय असे एकांगी आयुष्य नसावे. जीवनात समतोल हवा. मी राजकारणी असूनही कला-साहित्याची आवड बाळगतो, असा मौलिक सल्ला पवारांनी आपणास दिला. त्यांच्यामुळेच आयुष्यात समतोल साधू शकलो"
यानंतर बोलताना राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, पवारांनी सार्वजनिक कामात कधीच पक्षपात केला नाही. ९३ चे बॉम्बस्फोट असो अथवा किल्लारी भूकंप महाराष्ट्राला सावरण्याचे काम पवारांनी केले.
दस्तुरखुद्द माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या या कौशल्याची दखल घेत आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पवारांवर सोपविली. याहून मोठे प्रशस्तीपत्रक कोणते असेल. राज यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ते म्हणाले, राज तुमच्याकडे एक आमदार असला म्हणून काय झाले. आमचे तर दोनच (खासदार) होते, वेळ बदलेल. दिल्लीपर्यंत जाल, वाटल्यास एकत्र जाऊ. समोर पवारांचा आदर्श ठेवा. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढणारे सगळे नेते आज व्यासपीठावर पवारांचे कौतुक करतायत. याचे काहींना आश्चर्य वाटेल. पण, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी दुस्वास करणे, ही आपली परंपरा नाही. अविश्रांत कष्ट ही पवारांची ओळख आहे. ते कधी झोपत असतील का असा प्रश्न मला पडतो. अनेकांची झोप उडविणाऱ्या पवारांनी स्वत: जागे राहात अनेकांना जागते रहो, करायला लावले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
असा नेता एक-दोन वर्षात घडत नाही. ते तपस्येचे फळ आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. यावेळी राज्यपालांनी अस्सल मराठीत आपल्या दोन इच्छा बोलून दाखविल्या. एक म्हणजे पवारांना दीर्घायुष्य लाभावे आणि वयाची शंभरी पार करावी. आणि दुसरी म्हणजे शंभरीचा सोहळा पाहाण्याचे भाग्य आम्हाला लाभावे.