परळी (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
अनावरण आणि ५० फूट उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
राज्यात भाजपाला वैभव प्राप्त करून देत असतानाच मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी गोपीनाथगडाच्या माध्यमातून त्यांचे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. अष्टकोनी कमळाच्या आकारात समाधिस्थळ असून, त्याची उंची ७२ फूट आहे. त्याच्याच बाजूला २२ फूट उंचीचा त्यांचा पंचधातूपासून तयार केलेला पुतळाही उभारण्यात आला आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ््यात दिली.
गोपीनाथगडाची निर्मिती समाजाच्या पैशांतून झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोपीनाथरावांच्या मृत्युनंतर पंकजा यांनी नेतृत्व स्वीकारून लोकांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले.
गोपीनाथगडाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि मजुरांच्या आर्थिक उन्नतीचा विडा आपण उचलला असून, बाबांना अपेक्षित असलेल्या विकासाचे आणि समाजकार्याचे माध्यम म्हणून हा गड कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.