दुबई (पुणे सुपरफास्ट न्युज) वृत्तसंस्था -
दुबाईतील
‘द अॅड्रेस’ या ६३ मजली आलिशान
हॉटेलमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच
भीषण आग लागली. नववर्षाच्या स्वागतासाठी
हॉटेलमध्ये खास पार्टीचे आयोजन
करण्यात आल्यामुळे प्रचंड गर्दी होती.
त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली.
सुदैवाने या आगीत जीवीतहानी झाल्याचे
वृत्त नाही. सर्वांना सुखरुप बाहेर
काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आग इतकी मोठी होती की संपूर्ण
इमारतीलाच आगीने वेढले होते.
हॉटेलच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेलच्या २० व्या मजल्याला आग लागली. त्यानंतर ती आणखी वाढत गेली. हॉटेलमध्ये एकूण २०० खोल्या आहेत. नववर्षाचे सेलिब्रेशन असल्यामुळे हॉटेलमध्ये गर्दीही भरपूर होती. पण आग लागल्याची वेळीच माहिती मिळाल्याने जीवीतहानी टळली.