लागली समाधी ज्ञानेशाची 
(पुणे सुपरफास्ट न्यूज)-

श्री क्षेत्र आपेगाव इथे आज पार पडणार्या संजीवन समाधी सोहळ्य निमित्त विशेष.
सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील बंधनाच्या श्रुंखला आपल्या समर्थ प्रज्ञेने तोडून टाकण्याचे आणि भक्तीच्या क्षेत्रात समतेचा ध्वज मुक्तीच्या गगना पर्यंत फडकविण्याचे काम संत श्रेष्ठ ज्ञानदेवा सारखा ज्ञानयोगीच करू शकतो हे सत्य आजही आपणास नाकारता येणार नाही ज्ञानदेवांच्या प्रयत्नमुळेच गावगाड्यात गढून गेलेल्या गावकुसाबाहेर दबलेल्या,माणूस म्हणून अधिकार नाकारलेल्या चोखोबांच्या वाणीत धार आली. नामदेवासारखा शिंपी वात्सल्य भक्तीचा वस्तूपाठ सगळ्या महाराष्ट्राला शिकवू शकला.अध्यात्माचा प्रकाश पाहू न शकणाऱ्या असंख्य स्त्री-क्षुद्रांच्या भक्ती व कर्माच्या क्षेत्रातील आशा या क्रांतिकारी संताने जिवंत केल्या.सारे भक्तगण हि ईश्वराचीच रुपडी आहेत, असे तत्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या ज्ञानदेवांनी आपल्या कार्यद्वारा भक्तीभाव,मानवतावाद आणि भागवत धर्माचा पाया रचला
 जेव्हा भारतातील आध्यत्मिक तेजाचे तारे तुटून गेले होते,देव सगुण कि निर्गुण या वादाचा चिखल तुडवाण्याचे काम विध्वान मंडळी करत होती, धर्म आणि अधर्मातील फरक सर्वसामन्यांच्या लक्षात येत नव्हता,बहुजनांसाठी ज्ञानाची कवडे अभिजनांनी बंद केली होती तेव्हा याच अभिजनांच्या वर्णात शके ११९७ साली जन्माला येऊन बहुजनांसाठी ज्ञानाची कवाडे आपल्या समर्थ हातानी उघडण्याचे काम बहुजनांची माऊली संत ज्ञानोबारायांनी केले
आपल्या जन्माने व कर्माने या ज्ञानियाच्या राजाने महराष्ट्राचे भाग्य उजळून टाकले.असे म्हणतात कि जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी ईश्वर अवतार धारण करतो.दुर्जनांचा संहार करून सज्जनांना तो आपल्या पायाजवळ घेतो.संत ज्ञानदेव तर देवाच्याही पुढे दोन पाऊले गेले असे म्हटले तर आतीशोक्ती ठरणार नाही कारण त्यांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तर निर्माण केलीच परंतु दुर्जानांकडे हि दुर्लक्ष केले नाही,तर दुर्जनांना जवळ करण्याचे काम केले.अनेक शास्त्री-पंडित ज्या काळात केवळ ब्रम्हा आणि मायेचे झाड उभे करून सामन्यांवर वर आपल्या बुद्धीचा प्रभाव टाकण्याचे काम करत होते त्याच काळात सामन्यांच्या जीवनात पारमार्थिक आनंद निर्माण करण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले म्हणूनच तर आपली कृतज्ञता करताना तत्कालीन संत,कवी,कवियत्री म्हणाले
     “ महाविष्णूचा अवतार,सखा माझा ज्ञानेश्वर
      आदिशक्ती मुक्ताबाई,दासी जनी लागे पायी||
खरे पाहता संताचे संतत्व त्यांच्या येण्यावर आणि जाण्यावर अवलंबून नसते तर त्यांच्या राहाण्यावर अवलंबून असते,हे ज्ञानेश्वरांनी आपल्या छोट्याशा आयुष्याद्वारे सिद्ध केल.अवघाची संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या ग्रंथाच्या पंचारतीने जनताजनार्दनास ओवाळण्याचे आणि
             जे जे भेटे भूत|ते ते मानिजे भगवंत
                 हा भक्तीयोग निश्चित|जाण माझा||”  
अशी सर्व भूती भगवंत पाहण्याची शक्ती सर्वसामन्यांना प्रदान करण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.
 कविवर्य “बी”ने ज्ञानेश्वरांना सर्वात मोठा बंडवाला मानले आहे.आपल्या कवितेत ते म्हणतात
      मोठ्यांचा सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा|
 डांगोरा फोलकटचा पिटविला अलम दुनियेला               झंझोनी देवा दैत्या अमृतामध्ये न्हाली जनता
         उजळीला मराठी माथा||’ 
मराठी माणूस आणि मराठी भाषेचा माथा शब्दचैतन्याने उजळून टाकण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.ज्ञानदेवाच्या भाषिक बंडखोरीचा ज्ञानेश्वरी हा सर्वात मोठा पैलू आहे.ज्ञानेश्वरांच्या आधी अनेक आचर्य हे अध्यात्माच्या क्षेत्रातले सर्वश्रेष्ठ अधिकारी होते पण हा अधिकार ते देववाणी संस्कृत भाषेत गाजवत होते(जाणीवपूर्वक)हि भाषा कदाचित सर्वश्रेष्ठ असेलहि पण सर्व सामन्यांच्या दृष्टीने तिची अवस्था ‘कालाअज्छर भैस बराबर’ अशीच होती.ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम मराठी भाषेला शब्दांच्या पालखीत बसवून गर्भश्रीमंत करायचे काम केले.नव्हे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या क्रांतीदर्शी संताने प्रतिज्ञा केली
     माझा  मरहाठीची बोलू कवतुके|
     परी अमृताने हि पैजा जिंके|
      ऐसे अक्षरे रसिके मेळविण|| 
आणि हि प्रतिज्ञा सार्थ हि करून दाखवली.ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी हा केवळ धर्मग्रंथ नाही, तो तर एक जीवनग्रंथ आहे कारण ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही,भक्ती आहे पण भक्तीचे प्रदर्शन नाही,ज्ञान आहे पण ज्ञानाचा अहंकार नाही,शुद्ध,सात्विक जगण्यासठी ज्ञानेश्वरी सारखा दुसरा दीपस्तंभच नाही.
   हा होईल दान पसावो:
ज्ञानेश्वरीच्या समाप्तीत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पासायदान तर विश्वउध्दराचा अमृतकुंभच आहे.तो एक वैश्विक पातळीवरची प्रार्थना आहे विश्वातील अनेक धर्मसंस्थापकांनी जे वैश्विक विचार विश्वाला देता आले नाहीत ते विचार पसायदानाच्या अवघ्या नऊ ओव्यातून ज्ञानेश्वरांनी या विश्वाला दिले आहेत.पापी माणसाचे शरीर नष्ट करून पाप नष्ट होत नाही तर त्याची खलप्रवृती नष्ट झाली पाहिजे तरच सामान्य माणसाच्या जीवनात प्रसन्नतेचे मळे फुलतील,हा नवा विचार पसायदानाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी मांडण्याचे काम केले.
                         दुरितांचे तीमिर जावो
                         विश्व स्वधर्म सूर्य पाहो
              जो जो वांछील तो ते लाहो|प्राणिजात||”
अशी अपेक्षा व्यक्त करावी ती ज्ञान्देवानीच, ज्ञानेश्वरांनी जरी सिहासाने उधळून टाकणारी शास्त्राची बंडखोरी केली नसली तरी शब्द नावाच्या शास्त्राची बंडखोरी केवेल ज्ञानेश्वरीद्वारेच नव्हे तर अमृत अनुभव चांगदेव पासष्ठी,हरिपाठ व अभंगगाथा अशा अनेक ग्रंथाद्वारे सिद्ध करून द्खवली.
   लोपला दिनकर: अवघ्या २१ वर्षाच्या आयुष्यात तत्वचिंतकाना पुरुन उरणारे,साधकाच्या मनावर हळुवार फुंकर घालणारे आणि तुमच्या माझ्यासारख्य संसारीकाला तोल जाता जाता सावरणारे जीवनाभिमुख तत्वज्ञान देऊन झाल्यावर स्वर्गातल्या गंगेने जिचा हेवा करावा अशा इंद्रायणीकाठी आनंदाचा कंद असणार्या कर्मभूमी आळंदीत संजीवन समाधी घेण्याचा निर्णय ज्ञानेश्वारनी  घेतला.नामदेवासह सर्व वारकर्यांनी टाहो फोडला
   नामा म्हणे आता लोपला दिनकर
   बाप ज्ञानेश्वर समाधिस्त||
शके १२१८ रोजी सर्व सुखाची लहरी जनाई माऊली संजीवन समाधीच्याद्वारे या विश्वातल्या लेकरांच्याकडे वात्सल्यपूर्ण नजरेने पाहू लागली.आणि शेवटी एवढेच म्हणता येईल
    ‘’माझ्या देहालाच जेव्हा पाश यमाचे नेतील
    अत्मनिरंजन हे माझे तुझ्या हृदयी तेवेल||’’
                                                        -  ज्ञानेश भुकेले
                                                                संपर्क-७२७६२४६००४


 
Top