गुढ्या उभारुण आनंदोत्सव साजरा
पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - मौजे माळशिरस तालुका पुरंदर माळशिरस राजुरी रस्त्यावर असणा-या पाटिल वस्ती येथील मंदिरात आज गणपती विठ्ठल रक्मिणी, राम-लक्ष्मण-सिता, मारुती, अशा विविध मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करुण कलशारोहण करण्यात आले. यावेळी पाटिल वस्ती येथे गुढ्या उभारुण आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
काल संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत गावतुन सर्व मुर्तींची मिरवणुक काढल्यानंतर आज
सकाळी १० वाजता गणेशपुजनाने कार्यक्रमास सुरवात करुन नंतर नवग्रह पुजन ,होम -हवन केले त्यानंतर सर्व मुर्तींना पंचामृताने अभिषेक करुण श्री.सिध्द सद्गुरु शांतीनाथ महाराज ( पंढरपुर )यांचे हस्ते मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.त्यानंतर श्री शंखनाथ महाराज ( आळंदी ) यांचे हस्ते मंदिरावर कलशारोहण करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे पौराहित्य राजुरी येथील राजेंद्र अत्रे काका यांनी व त्यांच्या सहका-यांनी केले. कार्यक्रमानंतर श्री .सिध्द सद्गुरु शांतीनाथ महाराज ( पंढरपुर ) यांचे सुश्राव्य प्रवचन व महाप्रसादाचा भाविंकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे नियोजन श्री भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे चालक ह.भ.प.लक्ष्मण महाराज यादव यांनी केले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल यादव, पोपट जयवंत यादव, प्रकाश यादव, देविदास यादव, कुमाजी गंगाराम यादव, माणिक यादव व बाळासाहेब दिनकर यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष , सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक अरुण जगताप, डेक्कन को.बँकेचे अध्यक्ष काशीनाथ मोरे, भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव या मान्यवरांची उपस्थिती होती. ( प्रतिनिधी - विनय गुरव )