उत्तीर्ण होण्यासाठीची ५५टक्के गुणांची अट रद्द करण्याची मागणी

नगर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - उत्तीर्ण होण्यासाठीची ५५% गुणांची अट रद्द करण्यात यावी , या मागणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर कृषी पदवीधर संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ,येत्या शैक्षनिक वर्षापासून कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये किमान ४०टक्के  गुणांव्यतिरिक्त आता सर्व विषयातील सरासरी ५५टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत , हा निर्णय रद्द करावा अशी संघटणेची मागणी आहे ,या वेळी कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक महेश कडूस , अमोल धनवडे , सचिन महाडिक ,योगेश गुंड उपस्थित होते . ( प्रतिनिधी - योगेश भोसले )

 
Top