पिंपरी-चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे वाहनचालकाला अडवून
त्याच्याजवळील तीन लाखांचे दागिने लुटल्याची घटना काल रात्री नऊच्या
सुमारास घडली.
प्रदीप बाजीराव मोराळे (रा. शिवशंकर टॉवर, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी सहा अनोळखी दरोडेखोरांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोराळे हे काल आपल्या कारने बीडवरुन मुंबईला जात होते.
त्यांची गाडी वडगाव मावळ येथे आल्यानंतर तीन मोटारसायकलींवरुन आलेल्या सहा
जणांनी मोराळे यांच्या कारला आपल्या गाड्या आडव्या लावल्या. त्यानंतर
त्यांनी मोराळे यांना दमदाटी व मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याच्या
गोफ, सोनसाखळी व ब्रेसलेट असे एकूण 11 तोळ्याचे सुमारे 2 लाख 80 हजार रूपये
किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत तेथून पोबारा केला. या
प्रकरणी सहाही लुटारुं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत