पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - रेशन कार्डवर कायमस्वरूपी डाळ देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्याचा विचार करू  असे आश्वसन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सोमवारी दिले. रविवारी एका दिवसात ३० हजार किलो डाळ विक्री झाली.१०० किलो डाळ केल्यानंतर डाळीच्या विक्री मध्ये हा फरक दिसतो आहे.येत्या ४ दिवसात पुणे शहर आणि जिल्ह्या मध्ये १०० डाळ विक्री केंद्र सुरु होणार आहेत.डाळीचे दर गगनाला भिडल्याने सामन्यांच्या  खिशाला चटके बसणार होते पण त्यानंतर डाळ १०० रु किलो करणायत आल्या नंतर ज्या दुकानदारानकडून डाळ जप्त करण्यात आली होती,  त्यांच्या कडे ती परत उपलब्ध करून दिली जाणार होती पण यात पश्चिम महराष्ट्राचा आणि पुणे जिहल्याचा समावेश नव्हता ज्या मुले नागरिकाना  मध्ये नाराजी पसरली होती आणि गिरीश बापट यांच्यावर विरोधी पक्षाने नेहमी प्रमाणे टीकेची झोड उठवली होती.याच पार्श्वभूमिवर गिरीश बापट यांनी काही व्यापार्यांशी चर्चा करून डाळ १०० रु किलोने उपलब्ध करून देण्याची विनंती केली  होती.त्यानुसार सोमवार पासून डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.काल ग्राहक पेठ आणि कसबा पेठ इथल्या डाळ विक्री केंद्राचे उद्घाटन गिरीध बापट यांच्या हस्ते झाले. ( प्रतिनिधी-ज्ञानेश भुकेल )

 
Top