जुन्नर (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
 जुन्नर तालुक्यातील पूर्वभागात महत्वाचे मानले जाणारे आठवडे बाजारगाव म्हणजे "आळे गाव ", आळे येथील आठवडे बाजारचे पणन महामंडळाच्या माध्यमातून होणारे सुशोभीकरणाच्या कामाचा मार्ग आज अधिकारी ग्रामस्थ, ठेकेदार सरपंच व उपसरपंच यांच्यात झालेल्या चर्चेतून मोकळा झाला .
पणन महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्वाच्या आठवडे बाजारातील ओटयांचेचे व सुशोभीकरणाचा निर्णय  घेण्यात आला. या अंतर्गत आले येथील या आठवडे बाजाराच्या सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला.
दरम्यान आले येथील या आठवडे बाजाराचे सुशोभीकरणाचे काम सुरु झाले ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या  निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तशी माहिती समंधित अधिकार्यांना तक्रार अर्ज करून हे काम बंद पाडले 
आज सरपंच सौ. वर्षाती कुऱ्हाडे उपसरपंच धनंजय काळे म.जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर  कुऱ्हाडे समाज सेवक संजय भुजबळ, चारुदत्त साबळे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य पणन अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात या कामाविषयी चर्चा / आरोप प्रत्यारोपाची चर्चा  खूप रंगली व अखेर स्थानिक आणि सर्व अधिकारी यांच्यात समन्वय होऊन  कामाचा दर्जा उत्तम ठेवावा लागेल असा आदेश ठेक्दाराला पणन साहेबांनी गावकरी आणि सरपंच याच्या समोर दिल्याने काही दिवसांपासून बंद असलेल्या या आठवडे बाजाराच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला.   (प्रतिनिधी-केदारनाथ बरोळे).

 
Top