महात्मा फुले (इ.स.१८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) -
आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी.........त्या निमित्ताने पुणे सुपरफास्ट न्यूजच्या टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..........
“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.
त्यांच्या जीवनाचा आढावा थोडक्यात............
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा येथे झाला. इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह झाला.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात झाली.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना केली.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
तृतीय रत्न नाटक -इ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा- पोवाडा इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह- इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह- इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा आसूड- लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक- इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह- इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह- इ.स. १८८९
मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे त्यांचे निधन झाले.
