अहमदनगर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - शनि शिंगणापूरमध्ये शनिवार परंपरा मोडणारी घटना घडली आहे. एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन  शनिदर्शन घेतले. या घटनेने राज्यात खळबळ उडालीय.
शनिदेवाच्या चौथाऱ्यावर महिलांना परवानगी नाही. मात्र, पुण्यातून आलेल्या या भाविक महिलेने थेट सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत चौथाऱ्यावर शनिदर्शन घेतले.
एवढंच नाही तर शनिदेवावर तेलाचा अभिषेकही केला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी या महिलेचा निषेध केला आहे. तसेच या घटनेला सुरक्षा व्यवस्थेला जबाबदार असून शनि शिंगणापूर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
Top