पिंपरी -चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - चिंचवड स्टेशन येथील परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त
कार्यालयाशेजारील इमारतीमध्ये असलेल्या दोन दुकानाचे शटर उचकटून चोरीचा
प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
चिंचवड स्टेशन येथे असलेल्या पोलीस उपआयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या
अंतरावर असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर राजयोग मोटर्स नावाचे वाहनांच्या
स्पेअर पार्टचे दुकान आहे. हे दुकान पुणे-मुंबई महामार्गालगत रस्त्याला
लागूनच आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटले.
मात्र या दुकानामध्ये काहीही चोरीला गेलेले नसल्याचे दुकान मालकाने
सांगितले चोरीचा प्रयत्न फसल्याने दुकान मालकाने पोलिसांत फिर्यादं दिली
नाही, तर दुसऱ्या घटनेत राजयोग मोटर्स शेजारील इमारती च्या तळमजल्यात ब्लू डार्ट
कुरीयर कंपनी चे बुकिंग ऑफीस आहे या ऑफ़स चे लोंखडी शटर चेारटयानी उचकटून आत
प्रवेश केला व कागदपत्रे अस्ताव्यस्त केली या ठीकाणाह्लन नेमके काय योरीला
गेले आहे या बाबत सांगण्यास सिक्यूरीटी इनचार्ज याने बोलने टाळले
ब्लू डार्ट हे कुरीअर क्षेत्रातिल मोठेब्रॅंन्ड आसून नाव खराब हो०याच्या भितिने पोलिसात तक्रार देणा२ नसल्याची माहीती पूढे आली आहे.पहाटे घडलेल्या चोरीच्या घटनेत चोरट्या विरोधात फिर्याद दिलि नसल्याने अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही
मात्र अशा घटनेत पोलिस ठाण्यात तक्रार देउन स्वताहचे नाव
बदनाम हो०यापासून वाचनाऱ्या व्यवसाईका मुळेच चोरांचे मनोबल वाढत असावे कोणी
तक्रार दिली नसल्याने चोरी करण्यास चोर ही बेफाम होतात या मूळेच उद्योग
नगरीत भू२टया चोरी चे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
दोन दिवसांपुर्वीच गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चिंचवड
स्टेशन येथीलच आनंदनगर झोपडपट्टीमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर तेथील
स्थानिकांनी पुणे-मुंबई महामार्गावर उतरुन रस्त्यावर दगडं टाकून वाहतुक
काही वेळ अडवली होती. हा प्रकार देखील पोलीस उपायुक्त कार्यालयाशेजारीच
घडला होता. त्यामुळे शहरात पोलिसांचा किती धाक राहिला आहे हे स्पष्ट होत
आहे.