पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - बारामती व पुरंदर तालुक्यातील निसर्गमित्र  ; सर्पमित्र ; पक्षीमित्र ; छायाचित्रकार ; यांना एकत्रित करुण बारामती येथील निसर्गमित्र फैयाज शेख यांनी सह्याद्री ट्रेकर्स या संस्थेची सन २००२ साली स्थापना केली . या संस्थेच्या माध्यमातुन जनमाणसात निसर्गाविषयी जनजागृती करणे, निसर्गाविषयी आवड निर्माण करणे , तसेच निसर्गातील विविध प्राणी , पक्षी व नैसर्गिक संपत्ती याविषयी मार्गदर्शन करुन त्यांचे महत्व पटवुन देवुन संरक्षण करणे.व निसर्ग व त्यातील काही अंधश्रध्दा या विषयी जनजागृती करणे.व नेहमीच्या धावपळीच्या जीवनातुन तनावमुक्त होण्यासाठी  गड किल्ल्यांची सफर करणे. अशी विविध कामे केली जातात .गेल्या १३ वर्षांमध्ये ७० गडकिल्ल्यांच्या  सहली सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातुन आयोजीत केल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातुन दि.१४ व १५ नोव्हेंबर रोजी हरिश्चंद्रगड सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा केला जातो .याचे औचित्य साधुन संस्थापक फैयाज शेख यांनी लहान वयातच निसर्गाची ओढ लागावी या हेतुने  ज्या सदस्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांनी घेवुन यावे अशी विनंती केली .या वेळी यासहली मध्ये सारा फैयाज शेख ( ७ वर्षे ),  विहान प्रशांत तिवारी ( ७ वर्षे ), अमन मलेंद्र बल्ली ( १३ वर्षे ) नताशा जाधव ( १५ वर्षे ) या बाल सदस्यांनी सहभाग घेवुन निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेतला. त्याच बरोबर दोरीच्या सहायाने दरीत उतरण्याचा ( रँपलिंग ) सुध्दा आनंद घेतला गड परिसराची स्वच्छता सुध्दा केली.अशा प्रकारच्या सहलीच्या नियोजनात व सहभागात फैयाज यांना त्यांच्या पत्नी सुमेरा शेख व निसर्गमित्र सचिन जानराव डॉ सौरभ भांडवलकर ,अभिनेते सुशांत काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. ( प्रतिनिधी - विनय गुरव )

 
Top