जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे काही शेतकर्यांना या पावसाचा फायदा होतोय तर ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत त्यांना तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा फटका बसतोय.
रविवारी सकालपासून जुन्नर तालुक्यात मोथोया प्रमाणात ढग जमा होऊन दिवसभर उकाडा व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे हरभरा गहू ज्वारी या पिकांना फायदा झाला. परंतु दुसरीकडे फळबागा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
डाळिंब उत्पादकांची भेट घेतली असता अशी माहिती समजते कि कि हा सीजन हा डाळिंब झाडाला फळ -बहार येण्याचा असतो, परंत्रू या अवकाळी पावसाने फळबहार गळून जाऊन या झाडांवर रोग पडण्याची दात शकयता आहे .व दुसरीकडे कांदा उत्पादन शेतकरी या अवकाळी पावसाने कांद्याला करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे म्हणजेच शेतकार्यांना फळझाड असेल किंवा कांदा या पिकांना दुबार खत आणि दुबार फवारणी करावी लागणार असून त्यातू मिळणारे उत्पन्नाचे काय किंवा किती असेल याची धास्ती शेत्कारायान्च्ग्या मनात बसलेली आहे. ( प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे )
www.punesuperfastnews.com