चाकण ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - चाकणच्या भुजबळ आळी भागात त्रास देणा-या एका माकडाला येथील वसुंधराच्या कार्यकर्त्यांनी शिताफीने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. रस्त्यालगतच्या झाडांवर बसून येणा-या-जाणा-यांना चापट, बुक्क्या मारीत काही जणांना या माकडाने बोचकारले होते असे वसुंधराच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ,चाकण वनविभागाने त्या माकडाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु त्याला पकडण्यात यश आले नव्हते. एका घराच्या खिडकीतून माकड आत हात टाकुन बसला असता वसुंधराच्या कार्यकर्त्यांनी चपळाईने माकडाचे हात पाय बांधून बंदीस्त केले. नंतर वनविभागाच्या  ताब्यात देण्यात आले आहे . 
तर दुसऱ्या ठिकाणी खडकी येथे वानर जातीचा(नर) माकड गवळी वाडा,खडकी येथे लोकवस्तीत आलेल्या माकडास  (वाइल्डलाईफ वेलफेअर आसोशिएशन ((WWA) ) संस्थेच्या सदस्य सुरेश लोहिरे , विक्रम भोसले , स्वप्नील घाघ  यांनी पकडून  काञज घाटात निसर्गाच्या योग्य अधिवासात  सोडण्यात आले.
चाकण येथे संबंधित माकड मनोरंजनासाठी  आणले असण्याची शक्यता असून माकडाने त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्याला सोडून देण्यात आले असावे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.  मात्र सोडून देण्यात आलेल्या माकडाने नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली होती मनोरंजनासाठी लोकवस्तीत माकड आणून 'माकडचाळे' करणारा महाभाग नेमका कोण आहे?  हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माकडाची आरोग्य तपासणी केल्यानंतर प्राणी संग्रहालयात देण्यात येणार असल्याचे चाकण वन विभागाच्या अधिकायांनी सांगितले.
 
Top