पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - सर्वोत्कर्ष ट्रस्ट आणि संस्कार ग्रुप यांच्या वतीने उद्या १२ नोव्हेंबर रोजी गुरुवारी पहाटे ५ ते ८ दरम्यान शनिवार
वाडा पटांगण येथे दीपावली पाडवा पहाट निमित्ताने स्वरमयी दिवाळी पहाट या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, नृत्य व हास्यविदाने नटलेला सांस्कृतिक अविष्कार असून यात राजेश दातार आणि राधा मंगेशकर यांच्या सह रामेश्वरी वैशमपायन, मीनल
पोंक्षे, देबवर्णा बासू यांचे गायन, तसेच दिपाली कदम आणि भक्ती नाईक
यांच्या नृत्याचे सादरीकरण, दगडू शेठ हलवाई ट्रस्टच्या अनाथ मुलांच्या
नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
सुशीलकुमार यांच्या हास्य विनोदाचे आणि विजय जोशी यांचा
लोकमान्य टिळक यांच्या वेशातील अभिनय असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून
नाट्य व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.