पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - हल्लीच्या स्पर्धा युगात पत्रकारांचे जीवनमान गतिमान बनले आहे,दिवसभराच्या धावपळीमुळे शारीरिक ताणतणाव वाढल्याने पत्रकारांना अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे त्यामुळे प्रत्येक पत्रकारांनी 3 डिसेंबर हा आरोग्य दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज पुण्यात केले.
     पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीची पहिली बैठक आय बी हॉल पुणे स्टेशन येथे आज दुपारी पार पडली.यावेळी कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देशमुखसर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे होते.
कार्यक्रमात सर्वांचे स्वागत कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल यांनी केले.
  देशमुख पुढे म्हणाले की पत्रकारांना पेन्शन व संरक्षण या बाबी गरजेच्या आहेतच परंतु त्याही पेक्षा त्यांचे आरोग्य जपणे हे खुप महत्वाचे आहे.वर्तमानपत्रांचे दैनदिन काम करताना आरोग्यकडे दुर्लक्ष होते आणि तेच त्यांच्यासाठी फार घातक आहे.पत्रकारांसाठी असलेला धोका ओळखूण मराठी पत्रकार परिषदेचा 3 डिसेंबर हा वर्धापन दिन ' आरोग्य दिन' म्हणून जाहिर केला असून तो राज्यभर साजरा केला जात आहे.मागिल वर्षी राज्यातील 24 जिल्ह्यात साजरा झाला यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातून साजरा केला जाणार आहे.आरोग्य दिन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका संघानी पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी व उपचार करून साजरा करावा असेही आवाहन देशमुख यांनी केले.
बैठकीत पुणे शहर पत्रकार संघ निवडणूक,जिल्ह्यातील सभासद पत्रकार यांच्यासाठी ओळखपत्र,विमा पॉलिसी देणे, जिल्हा संघा तर्फे पत्रकार दिन साजरा करणे आदी विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.तसेच पुणे जिल्हा संघाच्या वतीने वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत चर्चा झाली.
बैठकीस पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे,सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर,कोषाध्यक्षा, वनिताताई कोरे,जिल्हा समन्वयक सूर्यकांत किंद्रे,विभागीय सचिव(पुणे शहर)सुनील वाळुंज,(पुरंदर) सुनील लोणकर,भोर वेल्हा पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधि भुजंगराव दाभाडे,जिल्हा संघ सदस्य,शाहनवाज तांबोळी,हवेली पत्रकार संघाचे प्रतिनिधि तुकाराम घोसाळकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
वनीताताई कोरे यांनी आभार मानले.
 
Top