मुंबई ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 173
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 डिसेंबर 2015 रोजी मतदान
घेण्यात येणार आहे; तर 21 डिसेंबर 2015 रोजी मतमोजणी होणार, अशी माहिती
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल 2016 या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्री 12 पासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कार्यवाही केली जाईल.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
• निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: 27 नोव्हेंबर 2015श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल 2016 या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्री 12 पासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कार्यवाही केली जाईल.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
• नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे: 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2015
• नामनिर्देशनपत्रांची छाननी: 5 डिसेंबर 2015
• नामनिर्देशनपत्रे मागे घेणे: 8 डिसेंबर 2015
• निवडणूक चिन्हांचे वाटप: 8 डिसेंबर 2015
• मतदान: 19 डिसेंबर 2015
• मतमोजणी: 21 डिसेंबर 2015
जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या:
ठाणे-3, रायगड-5, रत्नागिरी-50, सिंधुदूर्ग-2, नाशिक- 9,जळगाव-9, अहमदनगर-5, नंदूरबार- 1, पुणे- 2, सोलापूर- 11, सातारा- 13, कोल्हापूर- 4, औरंगाबाद- 3, बीड- 1, नांदेड- 12, परभणी- 9, उस्मानाबाद-2, जालना-4, लातूर-2, हिंगोली-5, अमरावती- 2, यवतमाळ- 2, बुलढाणा- 4, वाशीम- 3, चंद्रपूर-1, भंडारा-4 आणि गडचिरोली-5. एकूण- 173.