26/11/2008 रोजी मराठमोळी राजधानीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेस आज रोजी पाच वर्षे पूर्ण होत आली. या भ्याड हल्ल्याचे वर्णन व शहिदांना श्रध्दांजली देण्यासाठी कवी 'उन्मेष तायडे' यांनी रचलेली ही ह्रदयस्पर्शी कविता:
------------------------------
-------

@@ 26/11 ची काळरात्र @@

भयानक थरार देऊनि गेली
26/11 ची ती काळरात्र,
कुणास ठाऊक नीति अशी ही
जिने केली सुन्न मुंबई मात्र...

दुष्ट ह्या अशा दहशतवाद्यांनी
केले सुरू गोळीबाराचे सत्र,
प्रभावानेच या अपप्रवृत्तीच्या
हजारो निष्पापांचे हिरावले छत्र...

क्षणातच काही निघुनि गेले
उमदे, पराक्रमी करकरे,
गमावले लढवय्ये कामटे आम्ही
साळसकर, संदीप हे अमूल्य हिरे...

झाली रक्तरंजित भूमी शूरांची
त्या साठ तासांच्या निकर लढाईत,
गमाविले प्राण अमर वीरांनी
बेधडक, यशस्वी, शर्थीच्या चढाईत...

बहादूर कर्तव्यात या संरक्षणाच्या
स्वर्णाक्षरात कोरले नाम,
देशासाठी प्राण देणा-या
शूर वीरांना पहिला सलाम...

                       - कवी उन्मेष तायडे, पुणे
               
 
Top