combo
बारामती: आज राजकीय नेत्यांसोबतच उद्योग क्षेत्रातल्या लोकांनीही बारामतीत सत्ताधाऱ्यांना पाहुणचार देणाऱ्या पवारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला असून प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी ‘देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान म्हणजे शरद पवार’ अशी पावती पवारांना दिली आहे.
बारामतीसारखी १०० शहरे जेव्हा देशात उभी राहतील. तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमन उधळली आहेत. तर पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचे वक्तव्य प्रसिद्ध उद्योगपती राहुल यांनी केले आहे.
शरद पवारांच्या बारामतीत सध्या अर्थमंत्री अरुण जेटली आहेत. पवारांच्या निवासस्थानी रात्री मुक्काम केल्यानंतर आज जेटली आणि पवार एकाच मंचावर दिसून आले. विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे नामकरण जेटलींच्या हस्ते करण्यात आले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीला भेट दिली होती.
 
Top