army
पुणे : आग्नेय आशियातील देशांसह रशिया, चीन आणि अमेरिकेची सैन्य पथके मार्च २०१६ मध्ये होत असलेल्या बहुराष्ट्रीय युद्ध सरावात सहभागी होणार आहेत. एवढ्या मोठया स्तरावर पुण्यात पहिल्यांदाच युद्ध सराव होणार आहे. ब्रिगेडिअर अशोक नरूला यांच्या नेतृत्वाखाली एक टीम या युद्ध सरावाच्या तयारीला लागले असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारपासून पुण्यामध्ये या सरावासंदर्भात लष्करी अधिका-यांची बैठक सुरू झाली असून ही बैठक ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या बैठकीत दहशतवाद, तस्करी आणि घुसखोरी या विरोधात कारवाईसाठी एकमेकांना मदत करणे सोपे जावे तसेच परस्परांमधील लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी सहकार्य करावे या हेतूने पुण्यात युद्ध सराव होत असल्याची माहिती लष्करी अधिका-यांनी दिली आहे.
या युद्ध सरावात भारत, बु्रनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, जपान आणि अमेरिका आदी देश सहभागी होणार आहे. दहशतवाद, तस्करी आणि घुसखोरी हे प्रश्न जगभरात महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी त्या विरोधात कारवाईसाठी देशांनी लष्करी सहकार्य वाढविणे आणि दहशतवाद, घुसखोरी तसेच तस्करीविरोधात कारवाई करताना मदत करणे यासाठीच हा युद्ध सराव होत आहे.
 
Top